घणसोली येथील सिम्प्लेक्स सोसायटीत स्वयंपुनर्विकासाचे वारे, सभासदांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मदिरा, मटण आणि मनी ला नाकारत स्वप्नातील मोठ्या घराला दिले प्राधान्य.
नवी मुंबईत साधारण 500 पेक्षा अधिक इमारती या धोकादायक आहेत. त्यामुळे शहरात जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झालाय. इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प मिळावा यासाठी बांधकाम व्यावसायिक साम दाम दंड भेद वापरत असून त्यासाठी काही राजकीय मंडळींना हाताशी घेत आहेत. यामाध्यमातून सोसायटी कमिटी आणि काही सभासदांना मदिरा, मटण आणि मनीची मेजवानी देऊन संपूर्ण सोसायटी आपल्या ताब्यात घेऊन बांधकाम व्यवसायिकांना मलिदा खाण्यासाठी रेड कार्पेट अंधरत आहेत.
घणसोली येथील सिम्लेक्स सोसायटी मध्ये देखील काहीसा असाच प्रकार सुरु होता. नव्या घराच्या नावावर दुबई मधील लेबर कॉलनी सारख्या इमारती बनवून मोठ्या घराच्या नावावर थोडेसे क्षेत्रफळ वाढवून देण्यात येतंय. मात्र तेथील सभासदांना बांधकाम व्यावसायिक जेवढे घर देतोय त्यापेक्षा किमान दुप्पट घर मिळू शकतो, तुम्हाला इमारत बांधून होई पर्यंत भाडेही मिळेल वरून मेन्टेनन्स चार्जेससाठी देखील नियोजन होऊ शकते याबाबत जनजागृती केल्यावर आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे.
सिम्प्लेक्स मध्ये आता बांधकाम व्यावसाईकांना चले जावचे नारे देत स्वयंपुनर्विकासाचे वारे वाहू लागलेत. इतर सभासदांनी देखील सकारात्मक विचार केल्यास एक आदर्श प्रकल्प आणि खऱ्या अर्थाने नागरिकांचे स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अशीच संधि वाशी मधील नक्षत्र सोसायटी मधील सदस्यांना देखील आहे. यासाठी सभासदांनी पुढाकार घेत स्वयंपुनर्विकासाची हाक देण्याची गरज आहे.