बांधकाम व्यवसायिका मार्फत पूनरविकास करण्याऐवजी स्वयंपुनर्विकास का नाही….?
नक्षत्र सहकारी गृहनिर्माण सोसायटीची सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेला सर्व सोसायटी सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सभेत सोयटीचा पुनर्विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी बांधकाम व्यावसायिक इव्ही होम्सला देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. आता सध्या पुनर्विकास सुरु असलेल्या जेएन1 च्या दोन सोसायटी पेक्षा अधिक क्षेत्रफळ नक्षत्रला देण्यात येणार असून अनेक सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेय. मात्र इमारत पुनर्विकास करण्याऐवजी स्वयंपुनर्विकासाचा मार्ग नक्षत्रची सोसायटी कमिटी सभासदांना का दाखवत नाही हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय.
3 वर्षांपूर्वी जेव्हा जीर्ण झालेल्या इतर इमारतींचा पुनर्विकास बांधकाम व्यावसायिकांमार्फत सुरु करण्यात आला त्यावेळी स्वयंपुनर्विकास ही प्रक्रिया एकदमच नवीन होती ज्यात अनेक अडचणी होत्या. मात्र आता परिस्थिती बदललेय. मुंबईत अनेक सोसायट्या स्वयंपुनर्विकासातून निर्माण झाल्यात तर शेकडो गृहनिर्माण सोसायट्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग अवलंबवत आहेत. राज्य सरकार देखील स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांना मोठा लाभ देत आहेत. आता बांधकाम व्यावसायिक जेवढ क्षेत्रफळ देण्याचे आश्वासन देतोय त्याहून तिप्पट क्षेत्रफळ आणि अधिक सोयीसुविधा रहिवाशीयांना मिळू शकतात. असे असताना स्वयंपुनर्विकास संदर्भात सोसायटी कमिटी गप्प का, किमान स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया काय? स्वयंपुनर्विकास केल्यास आपल्याला किती अधिक लाभ मिळेल याची चाचपणी अथवा साधी माहिती घेण्याचा देखील सोसायटी कमिटीने प्रयत्न का केला नाही. सोसायटीच्या कमिटीने रहिवासीयांना जास्तीतजास्त लाभ मिळेल याचा विचार करणे आवश्यक असताना बांधकाम व्यवसायिकाचा विचार का केला जातोय. असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून रहिवाश्यांनी तरी किमान स्वयंपुनर्विकास म्हणजे काय एकदा त्याची माहिती घ्या मगच अंतिम निर्णय घ्या असा रेटा सोसायटी कमिटीकडे लावणे आवश्यक आहे तरच हालचाली होऊ शकतात आणि आपण जे स्वप्न मोठ्या घराचे पाहतोय त्यापेक्षा किमान दुप्पट मोठं घर मिळविणे शक्य आहे. प्रत्येक सभासदाने किमान यासाठी प्रयत्न तरी करावेत.
सिद्धेश म्हात्रे
8898050148